शिवनेरी चहा....... अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि इतिहास घडवला. तोच स्वाभिमान जपत आम्ही आमच्या व्यवसायाचे नाव "शिवनेरी चहा" ठेवले. कुठलाही व्यवसाय असू द्या त्यामध्ये ऊर्जा, सातत्य आणि सयंम हा असावाच लागतो तेव्हा तो व्यवसाय यशस्वी होतो. आज "शिवनेरी चहा" हा व्यवसाय करत असताना आम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो की आम्ही कमी दिवसामध्ये यशेच्या दिशेने वाटचाल करतोय. आज खूप लोके अशी आहेत की ज्यांना व्यवसाय करून यशस्वी व्हायचे आहे परंतु कुठे गुंतवणूक करू, काय व्यवसाय करू ह्या बाबत गोंधळ उडतो. एका कोविड सारख्या कठीण प्रसंगावर मात करून आम्ही ह्या व्यवसायात उतरलो आणि आपला ठसा उमटविणे हे ध्येयउराशी बाळगून आम्ही चहाचा व्यवसाय करतो आहे. आमच्या चहाची विशिष्ट चव आणि लोकांची पहिली आवड आहे. अगदी कोणी रोज आमच्या शॉप पासून नित्यनेमाने जात असेल तर तो "शिवनेरी चहा" मध्ये हमखास येणार. अवघ्या 2 ते 3 वर्षांमध्ये लोकांचा इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद खरंच अविश्वसनीय आहे. दर्जेदार चवीचा शेन्द्रीय गुळाचा चहा आणि चहाच्या दुकानांची एक अनोखी शैली आणि एक आनंदी वातावरण अशी आमची वैशिष्ट्ये आहेत. आम्ही आमच्या ग्राहकांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असतो आणि उत्कृष्ट सेवा देण्याचा कठोर प्रयत्न करतो. “शिवनेरी चहा” चे दालन संपूर्ण महाराष्ट्रात नही तर संपूर्ण भारत भारत उघडेल आहे . त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचे नाव “शिवनेरी चहा”च्या माध्यमातून पोहोचविण्याचे ध्येय आम्ही उराशी बाळगून पुढे वाटचाल करीत आहोत. आमच्या व्यवसायाची सुरुवात करत असताना आम्ही इतर चहाच्या व्यवसायापेक्षा उत्कृष्ट सेवा देण्याचा नेहमीच प्रयत्न करत आहोत आणि इथून पूढे सुद्धा नक्कीच करत राहील. प्रत्येक ग्राहकाला अनोखा व वैयक्तिकृत टी हाऊसचा अनुभव देण्याच्या उद्देशाने, आज शिवनेरी चहा हा एक प्रतिष्ठित ब्रँड आहे.